इचलकरंजी राष्ट्रीय लोकअदालतीत ५५ प्रकरणे निकाली –अठ्ठेचाळीस लाख रुपये वसुली
इचलकरंजी
मा. श्री. एम. आर. नेरलेकर, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी ५५ प्रकरणे निकालात काढत अष्ठेचाळीस लाख रुपयांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायत, वीजवितरण कंपनी आणि बँकांची दाखलपूर्व १४५२ व न्यायालयातील प्रलंबित असलेली २११९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील ३७ व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १८ प्रकरणे अशी एकूण ५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून अड्ठेचाळीस लाख इतकी वसुली झाली.
या लोकअदालतीसाठी एकूण ०६ पॅनेल ठेवण्यात आले होते. मा. श्री. एम. ए. भोसले, जिल्हा न्यायाधीश-२, इचलकरंजी, मा. श्री. बी. टी. येंगडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, इचलकरंजी, मा. श्री. जी. एम. नदाफ, तिसरे सह. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, इचलकरंजी, मा. डॉ. श्री. डी. जी. पटवे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी, मा. श्रीमती एम. एम. चौधरी, दुसरे सह. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी, मा. कु. एम. एस. गावडे, पाचवे सह. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले.
तसेच न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ श्री. अजिंक्य शेळके, विधीज्ञ रिता पट्टेकरी, विधीज्ञ सौ. सोनाली किल्लेदार, विधीज्ञ सना आलासे, विधीज्ञ पूर्वा केरले, विधीज्ञ श्री केशव मोदानी यांनी काम पाहिले.
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी मा. श्री. एम. आर. नेरलेकरसाो, जिल्हा न्यायाधीश-१ व श्री एम. ए. भोसलेसो, जिल्हा न्यायाधीश-२, इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. आर. आर. तोष्णीवाल, उपाध्यक्ष श्री. राजाराम सुतार, सचिव श्री. अभिजीत माने, सहसचिव श्री आदित्य मुदगल, खजिनदार श्री. विजय शिंगारे, श्री. राहूल काटकर, श्री. शैलेंद्र रजपूत, श्री. महेश कांबळे तसेच इतर वकील संघटनेचे सदस्य व हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी चे श्री ज्ञानेश्वर दि. मिरजकर व सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लोकअदालतीचे कामकाज बघताना आ.न्यायाधीश तसेच विधिज्ञ
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







