इचलकरंजीतील १८ शाळांचा १००% निकाल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील १८ शाळांचा १००% निकाल

इचलकरंजी,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेतील यशाची परंपरा शहर व परिसरातील शाळांनी यंदाही कायम राखली आहे. इचलकरंजी शहरातील १८ आणि परिसरातील ४ अशा एकूण २२ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवत्तेत यंदाही विद्यार्थीनींनी अव्वल स्थान मिळविले आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होताच तो पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी नेट कॅफेवर गर्दी केली होती. शाळांसमोर आतषबाजी करत अनेकांनी जल्लोष साजरा केला.
इचलकरंजी हायस्कुल – डीकेटीई सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कुलमधून १५१ विद्यार्थी या परिक्षेस बसले होते. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये रुजुल प्रशांत कनुजे, हिने १०० टक्के गुण मिळवून प्रथम, आर्या नंतकुमार कामिरे हिने ९८.६० (द्वितीय) आणि अनुष्का देवराज पाटील हिने ९८.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
           इचलकरंजी हायस्कुल (राजवाडा), इचलकरंजी हायस्कुल मराठी मिडीयम (नारायण मळा), श्री बालाजी इंग्लिश मिडीयम, इचलकरंजी हायस्कुल इंग्लिश मेडीयम, नॅशनल हायस्कुल, मॉडर्न हायस्कुल, जवाहर हायस्कुल, सरस्वती हायस्कुल, उर्दू हायस्कूल, मथुरा हायस्कुल, भारती हायस्कुल, साई इंग्लिश स्कुल, नाकोडा हिंदी हायस्कुल, रामभाऊ जगताप हायस्कुल, दिशा इंग्लिश स्कुल, जिझस हायस्कुल, युनिक हायस्कुल, बिशप्स इंग्लिश स्कुल या इचलकरंजीतील शाळांचा तर कबनूर हायस्कुल, व्यंकटेश्वरा हायस्कुल, अनस इंग्लिश स्कुल, बिशप्स हायस्कुल तारदाळ या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
श्री बालाजी विद्यालय – श्री बालाजी विद्यालयामध्ये अक्षरा सचिन खाडे, श्रावणी संदिप पारसे, तेजस गोपाल उदगट्टी या तिघांनी ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम, कांदबरी कुमार कांबळे हिने ९७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर मानसी अनिल कवडे हिने ९५.८० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक पटकावला. प्रशालेतून परीक्षेस बसलेले १९१ सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
व्यंकटराव हायस्कुल – व्यंकटराव हायस्कुलमधून परिक्षेस बसलेल्या १९४ पैकी १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल ९८.९६ टक्के लागला आहे. या शाळेत श्रेया विजय पाटील ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सायली रमेश ढेरे ९५.४०, ज्योतिरादित्य यशवंत जाधव ९५.४०(द्वितीय) आणि ओंकार महेश वायचळ ९४.८० गुण मिळवून तृतीय आला आहे.
राजर्षी छत्रपती शाहु हायस्कुल – महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहु हायस्कुलचे १५५ पैकी १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल ९८.७० टक्के लागला आहे. यामध्ये सिद्धी रामगोंडा कागले हिने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम, पद्मजा मधुकर कुंभार हिने ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर अमृता संजीव बिळगी हिने ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.     
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव !23 देशांतील 25 हजार, तर सांगली जिल्ह्यातून 1 हजारहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !

Read More

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव !23 देशांतील 25 हजार, तर सांगली जिल्ह्यातून 1 हजारहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !