शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्यावतीने जागतिक अमलीपदार्थ विरोधी जनजागृती दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न
इचलकरंजी :
जागतिक अमलीपदार्थ विरोधी जनजागृती दिन व छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्यावतीने विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.दत्ताजीराव कदम ए.एस.सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. शंकर खाडे यांनी भूषवले. प्रमुख वक्ते डॉ. संदेश पाटील (वैद्यकीय व मानसोपचार तज्ञ) व सौ. भाग्यश्री देवमोरे (आरोग्य सल्लागार) यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत प्रोजेक्टर स्लाईडच्या साहाय्याने सखोल मार्गदर्शन केले.
Advt
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि कायद्यातील बदलांविषयी माहिती दिली. कार्यक्रमात पोनि दिलीप पवार, सपोनि विजय गोडसे, पो.हे.का. वसंत घुगे, पो.कॉ. असीफ मुल्लानी तसेच २००-२५० विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होते.
त्यानंतर जीजस हायस्कूल व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. ‘व्यसनाचा पाया मोडा, आयुष्य सुखाशी जोडा’, ‘नशा नको, आयुष्य हवे’ अशा घोषवाक्यांनी शहर दणाणून गेले. या फेरीत १००-१५० विद्यार्थी, शिक्षक, पो.उ.नि. संभाजी भोसकर, पो.कॉ. बरगाले, परीट, भरत केदार, पो.ना. प्रसन्ना कांबळे सहभागी झाले.
चंदूर येथील वि.न्यु इंग्लिश स्कूलमध्ये किशोरवयीन मुलांसाठी व्यसनमुक्तीबाबत विशेष सत्र घेण्यात आले. पोसई रत्ना गवळी, पो.कॉ. भरत केदार, पो.कॉ. बाईत यांनी कायदेशीर माहिती दिली. शिक्षक, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे आंबेडकर नगर कबनूर येथे शाहू महाराज जयंती व जनजागृती दिनानिमित्त किशोरवयीन मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पोसई रत्ना गवळी यांनी महिलांचे कायदे, व्यसनापासून दूर राहण्याचे मार्ग यावर मार्गदर्शन केले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







