शहापूर येथे ट्रकच्या निष्काळजी पार्किंगमुळे ट्रान्सफॉर्मर व वाहनांचे ६ लाखाचे नुकसान.
शहापूर, – शहापूर औद्योगिक वसाहतीत पार्क केलेल्या ट्रकच्या निष्काळजीपणामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा मोठा अपघात घडून आला. या घटनेत ट्रान्सफॉर्मरसह सात मोटारसायकली आणि तीन सायकलींचे एकूण ६ लाख ५ हजाराचेरुपये नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पुंडलिक बाबुराव कुंभार (वय ३९, व्यवसाय – सहायक अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय शहापूर, सध्या रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर गावातील सुप्रीम ऑटोकास्ट समोरील भागात घडली. आरोपी हरपालसिंग धिरुबा जडेजा (वय २६, रा. खोंबडी मोठी, ता. नखत्राणा, जि. भुज, गुजरात) याने GJ 12 BZ 9232 क्रमांकाचा ट्रक अत्यंत निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला पार्क केला होता. ट्रकच्या मागील चाकांना कोणताही अडथळा न लावता, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत आरोपी झोपी गेला.
या निष्काळजीपणामुळे बंद स्थितीत ट्रक पुढे सरकला व २०० KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे खराब झाला. त्याचे नुकसान अंदाजे ४,८०,००० रुपये इतके आहे. याशिवाय ट्रकच्या धडकेमुळे खाली उभ्या असलेल्या ७ मोटारसायकली आणि ३ सायकली यांचे अंदाजे १,२५,००० रुपये नुकसान झाले.शहापूर पोलिसांतर्फे पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







