श्री आदिनाथ को-ऑप. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जयकुमार उपाध्ये यांची नियुक्ती; उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निलेश बागणे व संतोष रायनाडे यांचीही नियुक्ती
इचलकरंजी :
श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी या नामवंत सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना बँकिंग क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक अनुभव असून, गेली चार वर्षे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
श्री. उपाध्ये यांनी B.Sc., DCS, G.D.C & A, CAIIB ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली असून त्यांनी रिझर्व्ह बँकेचे Fit & Proper पात्रता निकषही यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत सक्सेशन प्लॅनिंग धोरणानुसार विविध पदांवर सेवकांना पदोन्नती देण्यात आली. बँकेच्या वाढत्या व्याप आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या परिपत्रकांनुसार कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कार्यक्षम व्यवस्थापनासाठी, बँकेने दोन स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदांची निर्मिती केली आहे.
Advt
या अंतर्गत श्री. निलेश दादासो बागणे व श्री. संतोष भरमू रायनाडे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांकडे स्वतंत्रपणे कर्ज वितरण, वसुली आणि तांत्रिक सेवा-सुविधा यासंबंधीचे कार्य विभाजित करण्यात येणार आहे.या नियुक्त्या बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ करून ग्राहकसेवा अधिक गतिमान करतील, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







