येथील कु.तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक म्हणून निवड.
इचलकरंजी
येथील सौ.रूपाली व श्री.राजेंद्र गोपाळराव करजगार यांची कन्या कु.तेजस्विनी राजेंद्र करजगार हिचे हायस्कुलपर्यंतचे शिक्षण गंगामाई विद्यामंदीर येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण गोविंदराव हायस्कुल येथे घेतले. एम.ए. पर्यंतचे शिक्षण टिळक युनिवर्सिटी पुणे येथून घेतले, त्यांनतर एल.एल.बी. चे शिक्षण शहाजी कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण केले व इचलकरंजी येथील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट येथे मराठी लघुलेखन १२० स्पीड व इंग्रजी लघुलेखन १२० स्पीड चे शिक्षण पूर्ण झाले आहे.
या तीच्या यशामध्ये तीची आई, वडील, भाऊ व महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टीट्यूटचे रशिद शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







