ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई येथे आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबीराचा ३५० जणांना लाभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई येथे आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबीराचा ३५० जणांना लाभ

इचलकरंजी:
  डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग, सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, मिरज, नागरी सेवा आरोग्य  केंद्र, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३५० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात आले. यासोबत दादांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफसाठी हाफ पिज क्रिकेट स्पर्धा देखील मोठया दिमाखात संपन्न झाल्या यावेळी दादांच्या हस्ते सदर क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस संमारंभ पार पडला.
आरोग्य शिबीराची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी.सौंदत्तीकर, डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या शिबीरामध्ये संस्थेच्या वतीने दादांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मनोकामना व्यक्त केल्या.यानंतर दादांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी महागाव कॉलेजचे प्राचार्य डॉ एस.एच.सावंत, डी.वाय.पाटील सीएसई चे प्रा. डॉ. बी.डी.जितकर व वसंतदादा पाटील मॅनेजमेंट एमसीए च्या विभागप्रमुख सौ.व्ही.एस.जाधव, सोशल डीन व एनएसनएस विभागप्रमुख सचिन कानिटकर, सर्व विभागप्रमुख यांचेसवे सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल,मिरज यांचे हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या शिबीरामध्ये इसीजी, नेत्र तपासणी, दंत तापसणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, प्रोस्टेट, अशा अनेक तपासण्या करुण टी.टी. चे इंजिक्शन मोफत देण्यात आले.त्याचबरोबर यावेळी उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला. या शिबीराच्या आयोजना बद्दल सर्व स्टाफनी समाधान व्यक्त केले. प्रा.सुयोग रायजाधव,श्रीकांत बेडक्याळे यांनी संयोजन प्रतिनीधी म्हणून काम पाहिले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी राहूल जगताप, प्रितम पाटील, किरण लंगोटे, निरंजन शेटटी, दिपक जाधव, दत्ता पाटील यांच्यासवे सर्वांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी – डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे यांच्या वाढविसानिमित्त भरविण्यात आलेल्या शिबीरात आरोग्य तपासणी करीत असताना डीकेटीईचे कर्मचारी. 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा