कोल्हापूर जिल्ह्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ मजूर झाल्याने इचलकरंजी भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा.
इचलकरंजी ता. २ ऑगस्ट
मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सो
भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे जी यांचे मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. असे उद्गार आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. तसेच कोल्हापूरात खंडपीठ व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी वकील, बार असोसिएशन, विविध सामाजिक संघटना यांचे आभिनंदन यानिमित्ताने केले. यावेळी मलाबादे चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी, पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशीकांत मोहिते, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने, पै.अमृतमामा भोसले, अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, राजेश रजपुते, प्रकाश दत्तवाडे, प्रसाद खोबरे, शेखर शहा, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, भारत बोंगार्डे, शिवानंद रावळ, शुभम बरगे, प्रमोद बचाटे, सौ.अश्विनी कुबडगे, सौ. सपना भिसे, सौ.नीता भोसले, सौ.सीमा कमते, शबाना शहा, सौ.सुवर्णा लाड, नागुबाई लोंढे, मंगल सुर्वे, अमिता बिरंजे, नजमा शेख, सुधीर पाटील, सनी ओऊळकर, काशिनाथ पुजारी, नरसिंग परीक, बाळकृष्ण तोतला, राहुल घाट, सागर कचरे, सतीश मुळीक, संजय गेजगे,प्रदिप मळगे, सचिन माळी, सलीम शिकलगार, प्रवीण रावळ, सतीश भस्मे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
आनंदोत्सव साजरा करताना आ.राहुल आवाडे,श्रीरंग खवरे,शशिकांत मोहिते,अनिल डाळ्या,बाळासाहेब माने,अमृत भोसले,सतीश मुळीक व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









