दोन महिन्याच्या बाळाची शस्त्रक्रिया यशस्वी – खासदार माने व नगरसेवक पाटील यांचे विशेष प्रयत्न
इचलकरंजी
हातकणंगलेतील कोरवी गल्ली येथील माणतेश कोरवी-जाधव यांच्या दोन महिन्याच्या बाळाचा डाव्या पायाचा गुडघा उलट्या दिशेने असल्याने शस्त्रक्रिया आवश्यक होती. उपचारासाठी बाळाला डॉ. नेगांधी हॉस्पिटल, इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले. जास्त खर्च येणार असल्याने बाळाचे मामा दीपक माने यांनी नगरसेवक रणजीत पाटील यांच्याकडे मदतीची विनंती केली.
नगरसेवक पाटील यांनी तात्काळ खासदार धैर्यशीलदादा माने यांच्याशी संपर्क साधून हॉस्पिटल प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला. त्यानुसार हॉस्पिटलने बिलात भरघोस सूट दिली. बाळाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पुढील उपचार सुरू आहेत.
या सहकार्याबद्दल कोरवी-जाधव कुटुंबीयांनी खासदार माने, नगरसेवक पाटील, डॉ. नेगांधी, तसेच शिवसेना पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कोरवी व जाधव कुटुंबियांनी रणजित पाटील यांचे आभार मानले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







