सर्किट बेंच स्थापनेचा वकीलांकडून आनंदोत्सव.
इचलकरंजी:
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झालेने इचलकरंजी येथील वकीलांनी न्यायालयाचे प्रवेशद्वारासमोर फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी आमदार राहूल आवाडे हे उपस्थित होते. सर्किट बेंचचे स्थापनेमुळे सहा जिल्ह्यांतील जनतेचे स्वप्न साकार झाले असून मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांना दिलासा मिळाला आहे, न्याय्य हक्कांसाठी मुंबईला जावे लागणाऱ्या हजारो पक्षकारांना सर्किट बेंचचे माध्यमातून न्याय मिळणार असलेने पैसा आणि वेळेची बचत होणार असलेची भावना दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूरात स्थापन व्हावे या प्रदिर्घ मागणीस यश मिळाले असून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या सर्किट बेंचचा शुभारंभ १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. वकील व पक्षकारांतून याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
यावेळी बोलताना अॅड. राजगोपाल तोष्णीवाल यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, खासदार धैर्यशिल माने, आमदार राहूल आवाडे तसेच लोकप्रतिनिधी, बारचे सर्व माजी अध्यक्षांचे व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळालेची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी आमदार राहूल आवाडे यांनी इचलकरंजी येथील न्यायसंकुलासही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जेष्ठ वकील अॅड. डी. एम. लटके यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जेष्ठ वकील अॅड. एम. डी. जमादार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी अॅड. विजय गजगेश्वर यांचा पोलीस अधिक्षक कार्यालयातील विशेष सरकारी वकिल अॅड. बी.एम. सुर्यवंशी यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करणेत आला. यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, प्रविण फगरे व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदोत्सव साजरा करताना आ.राहुल आवाडे,अँड राजगोपाल तोष्णीवाल व वकील बांधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








