अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजी आगाराची गणपतीपुळे साठी विशेष बस
इचलकरंजी (प्रतिनिधी) – दिनांक 12 ऑगस्ट 2025 (मंगळवार) रोजी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त, इचलकरंजी आगाराच्या वतीने गणपतीपुळे येथील श्री गणपतिप्रसाद दर्शनासाठी विशेष बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही विशेष बस सकाळी 06.00 वाजता इचलकरंजी आगारातून निघणार असून, गणपतीपुळे दर्शनानंतर दुपारी 03.00 वाजता परतीसाठी गणपतीपुळे येथून सुटणार आहे.
भाविक भक्तांची वाढती गर्दी आणि गणपतीपुळे येथील श्रद्धास्थळाचे महत्त्व लक्षात घेता ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. सदर बस सेवा ऑनलाईन आरक्षणासाठी खुली करण्यात आलेली असून, भाविकांनी वेळेत आरक्षण करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी आगार प्रशासनाने केले आहे.
अधिक माहितीसाठी एस.टी. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा स्थानिक आगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







