ICHMH51NEWS.IN
9921600800

“स्तनपान आईसाठीही तितकंच महत्वाचं” – डॉ. भाग्यरेखा पाटील.इचलकरंजीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“स्तनपान आईसाठीही तितकंच महत्वाचं” – डॉ. भाग्यरेखा पाटील.इचलकरंजीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

इचलकरंजी:

“आईचं दूध हे बाळासाठी पोषणदायी असतंच, पण मातेला मातृत्वाचा सुंदर अनुभव देणारे स्तनपान हे आईसाठीही तितकंच महत्वाचं आहे,” असे प्रतिपादन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी केले.

प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे – “स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा“. या अंतर्गत, स्तनपान करणाऱ्या मातांसाठी मजबूत, समान आणि दीर्घकालीन आधार व्यवस्था उभारण्यावर भर दिला जातो.

या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बालरोगतज्ञ डॉ. संदीप मिरजकर आणि डॉ. चंद्रशेखर लाटकर यांनी स्तनपानाचे शारीरिक व मानसिक फायदे उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमाला रुग्णालयाच्या सहा. अधिसेविका श्रीम. सीमा कदम, परीसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, रुग्णालय कर्मचारी, स्तनदा माता व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरोग तज्ञ परिचारिका श्रीम. सोनल माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधिपरिचारिका प्रतिमा कांबळे यांनी केले.

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ भाग्यरेखा पाटील व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा