धनराज कुंभार इचलकरंजी फेस्टिव्हल श्री चा विजेता
इचलकरंजी:
बलदंड शरीरयष्टीचे सादरीकरण करत विजेतेपदासाठी लागलेली चढाओढ आणि तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि प्रोत्साहन अशा त्रिवेणी संगमात इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत भव्य इचलकरंजी मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. त्यामध्ये धनराज कुंभार याने इचलकरंजी फेस्टिव्हल श्री चा मान मिळविला. तर सोहम साठे हा बेस्ट पोझिंग आणि अनिरुध्द नाईक हा मोस्ट मस्कुलार अॅन्ड इम्प्रुव्हडचा मानकरी ठरला.
Advt
इचलकरंजी फेस्टिव्हल आणि शरीरसौष्ठव स्पर्धा हे एक समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळे या स्पर्धेला तरुणाईचा उदंड प्रतिसाद लाभतो. यंदा ही स्पर्धा इचलकरंजी मर्यादीत ठेवण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील विविध जीमसह अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, अप्पर पोलिस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, प्रकाश दत्तवाडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता अजिंक्य रेडेकर, दिपक माने आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी तर स्वागत सेक्रेटरी शेखर शहा यांनी केले.
ही स्पर्धा ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० आणि ७० किलोवरील अशा चार गटात घेण्यात आली. सर्वच गटात मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ५५ ते ६५ किलो गटात चेतन वाझे, दिपक कुडाळकर व आदर्श मिरगे, ५५ ते ६० किलो गटात प्रथमेश शिंदे, आयान सनदी, अभिजित बागडे, ६० ते ६५ किलो गटात युवराज आडके, अवतार तमायचे, तुषार करांडे, ६५ ते ७० किलो गटात धनराज कुंभार, कार्तिक पराळ व द्वितेश धनवडे तर ७० किलोवरील गटात अनिरुध्द नाईक, योगेश गोंदकर व विजय टोणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व गटातील विजेत्यांमधून झालेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५ मध्ये धनराज कुंभार याने बाजी मारली.
स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेश वडाम, कैलास शिपेकर, संदीप यादव, दिपक माने, सचिन कुलकर्णी, दिपक खाडे, रविंद्र चौगुले व ओम सातपुते यांनी काम पाहिले
बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सादरीकरणं करताना स्पर्धक त्यावेळी उपस्थित माजी मंत्री प्रकाश आवाडे,शेखर शहा, श्रीरंग खवरे, अहमद मुजावर, प्रकाश दत्तवाडे
पारितोषिक वितरण करताना प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, शेखर शहा
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








