इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रभाग रचना जाहीर
इचलकरंजी :
राज्य शासनाच्या आदेशान्वये व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करून जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेत आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची रचना निश्चित झाली आहे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी एकूण ६५ नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी १६ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. यापैकी १५ प्रभाग हे ४ सदस्यीय तर एक प्रभाग ५ सदस्यीय ठेवण्यात आला आहे.प्रभाग भौगोलिक सीमा अधिसूचना प्रसिद्धी झाली असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १५ सप्टेंबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) निवडणूक विभाग, महापालिका मुख्यालय, इचलकरंजी येथे दाखल करता येतील.
Advt
महानगरपालिका आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांनी सांगितले की, नागरिकांनी प्रभाग सीमांबाबत हरकती व सूचना फक्त लेखी स्वरूपात सादर कराव्यात. Online किंवा वेबसाईटवरून आलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन नागरिकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.प्रभागांच्या व्याप्तीशी संबंधित प्रारूप अधिसूचना व नकाशे कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या निवडणूक विभागात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







