इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे बंद
इचलकरंजी : मजरेवाडी जॅकवेल येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये (रोहित्र) अचानक बिघाड झाल्याने इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून बंद झाला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने शहरवासीयांना पाणीपुरवठा पुढील काळात उपलब्ध राहणार नाही. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







