ICHMH51NEWS.IN
9921600800

बावचकर मामांच्या विचाराने कार्यरत राहणार-संजय कांबळे,कै.मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेसची आदरांजली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बावचकर मामांच्या विचाराने कार्यरत राहणार-संजय कांबळे,कै.मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेसची आदरांजली

इचलकरंजी
इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै मल्हारपंत बावचकर यांच्या १७ व्या स्मृतिदिना निमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ श्रुती जमदग्नी,श्रीमती आशाताई घोरपडे व सौ श्रद्धा बाळण्णावर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करणेत आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त करुन कै बावचकर मामा यांचे विचार आदर्श मानुन त्याच विचाराशी निष्ठा ठेवून  काम करणार असल्याचे सांगीतले, प्रसाद कुलकर्णी यांनी बावचकर मामांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला.
Advt
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी
शशांक बावचकर यांच्यासह इचलकरंजी विधानसभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, अरविंद धरणगुत्तीकर, किशोर जोशी,रवि वासुदेव, सचिन साठे, राजू किणेकर,प्रवीण फगरे, रमजान शिकलगार, रवि पाटील, अनिल पाच्छिन्द्रे,तौसिफ लाटकर,दिलीप भुई,योगेश कांबळे,दशरथ जावळे.प्रमोद नेजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व.मल्हारपंत बावचकर यांना आदरांजली वाहताना काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा