प्रबोधिनीत आज “मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद” हा एकपात्री कार्यक्रम,समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय, इचलकरंजी
इचलकरंजी:
स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केले होते. ते भाषण म्हणजे मानवधर्माचे जागतिक जनजागरण होते. त्या ऐतिहासिक भाषणाच्या १३२ व्या वर्धापनदिनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
Advt
” मानवतेचे उपासक : स्वामी विवेकानंद ” हा एकपात्री प्रयोग समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक , लेखक व ज्येष्ठ कलाकार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे ( आजरा) हे सादर करणार आहेत. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम
आज गुरुवार ता.११सप्टेंबर २०२५ सायं. ६ वाजता होणार आहे. तरी इचलकरंजी व परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास आवर्जून यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







