श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये ७५ वर्ष पूर्ती निमित्त संविधान जागृती कार्यक्रम संपन्न.
इचलकरंजी
श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेज , इचलकरंजी मध्ये संविधान जागृती कार्यक्रम संपन्न झाला.
संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने इयत्ता ११ वी आर्ट्स विभागाच्या विद्यार्थिनीसमोर संविधानासंबंधी संविधानिक जबाबदाऱ्या, कर्तव्ये, तत्त्वे व भारतीय नागरिकांची जबाबदारी, कर्तव्ये यांची माहिती करून देणारा हा उपक्रम प्रशालेमध्ये राबविण्यात आला.याद्वारे विद्यार्थिनींनी संविधानाची सखोल माहिती घेतली तसेच येणाऱ्या काळात विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल यांचीही माहिती देण्यात आली.
Advt
यासाठी प्रमुख वक्ते म्हणून गायत्री कुंभार मॅडम , अनुलोम मित्र , उपविभाग प्रमुख केदारजी मालदिवे, अनुलोम मित्र सूर्यकांत कोकरे व कुणाल जोशी हे लाभले होते.
तसेच प्राचार्या ए.एस. काजी , उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी , सहाय्यक अध्यापिका एस. एम. कवळेकर उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागाचे एस.आर. चोथे व एस. जी. माने यांनी कार्यक्रमाचे कामकाज पाहिले.
फोटो-
प्रमुख वक्ते गायत्री कुंभार, अनुलोम उपविभाग प्रमुख केदारजी मालदिवे, अनुलोम मित्र सूर्यकांत कोकरे व कुणाल जोशी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी , सहाय्यक अध्यापिका एस. एम. कवळेकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







