मटण दरवाढीविरोधात प्रांत कार्यालयात निवेदन
इचलकरंजी:
शहरात १२ सप्टेंबरपासून मटणाचा दर अचानक ४० रुपयांनी वाढवून ७६० रुपये किलो करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. या मनमानी दरवाढीविरोधात खवय्ये व दोस्ती ग्रुप तर्फे बुधवारी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात दरवाढ तातडीने मागे घेणे, कायमस्वरूपी धोरण आखणे, ग्राहक-विक्रेते समन्वयाने परवडणारा दर निश्चित करणे, तसेच सणानंतर जाणूनबुजून होणारी दरवाढ रोखण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अनेक खवय्ये उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







