ICHMH51NEWS.IN
9921600800

जन्ममृत्यू विभागाच्या सुशोभीकरण व लिपिक संख्या वाढविण्याची उमाकांत दाभोळे यांची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जन्ममृत्यू विभागाच्या सुशोभीकरण व लिपिक संख्या वाढविण्याची उमाकांत दाभोळे यांची मागणी

इचलकरंजी :

शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवांपैकी असलेल्या जन्ममृत्यू विभागात वाढत्या गर्दीमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे सुशोभीकरण व कर्मचारी वाढवण्यासाठी मागणी केली आहे.

जन्ममृत्यू विभाग हा सर्वसामान्यांसाठी संवेदनशील व दररोज वापरला जाणारा विभाग आहे. मात्र, येथील कार्यालयीन जागा व सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच लिपिकांची संख्या कमी असल्याने प्रमाणपत्रे व नोंदी प्रक्रियेस उशीर होतो, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर उपाय म्हणून विभागाचे सुशोभीकरण करून स्वच्छ, सुसज्ज व नागरिकांसाठी सोयीस्कर वातावरण तयार करण्यात यावे, तसेच लिपिकांची संख्या वाढवून सेवा अधिक तत्पर व सुलभ करण्यात यावी, अशी ठोस मागणी उमाकांत दाभोळे यांनी केली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा