महिला बचत गट कर्जमाफी ची भाकप माले ची मागणी
कोल्हापूर:
लाडक्या बहिणीना १५०० रुपये देऊन सरकार मायक्रो फायनान्सवाल्या सावकारांना पैसे देत आहे. त्यामुळे महिलांची संपूर्ण कर्जमाफी करावी व त्याना अल्प दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी येथे दिनांक २२ रोजी झालेल्या भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशन च्या हातकणंगले इचलकरंजी शिरोळ अधिवेशनात करण्यात आली. अध्यक्षस्थानी रेंदाळ चे ज्येष्ठ कामगार नेते कॉ वसंत तांबे हे होते.
इचलकरंजी व आजूबाजूच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, पंचगंगा प्रदूषण व महापूर प्रश्न सोडवा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, १२ तासाचा कामाचा दिवस रद्द करा, जातवार जनगणना करून सर्वाना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, शासकीय नोकरीतील रिक्त पदे भरा, मानधनी, कंत्राटी, पीसरेट वेतन पद्धती बंद करा, शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत करा, असे ठराव करण्यात आले.
Advt
महिलासुरक्षे बद्दल शासनाच्या हेळसांड करण्याच्या भूमिकेवर यावेळी कडक टीका वक्त्यानी केली.
याप्रसंगी पक्ष निरीक्षक म्हणून कॉ संजय गावडे उपस्थित होते. पक्ष समिती मध्ये अध्यक्ष वसंत तांबे, कार्याध्यक्ष सुरेंद्र पाटील (रेंदाळ) सचिव प्रकाश कांबरे (दर्याचे वडगाव) सहसचिव सुनील बारवाडे (इचलकरंजी) यांची पदाधिकारी निवड करण्यात आली. तसेच समिती सदस्य म्हणून चंद्रकांत जाधव (शिरोली) रजनी पाटील (नागाव) माणिक सावंत डेव्हिड लोखंडे (हेरले) तानाजी पाटील (अतिग्रे) अक्षय पाटील, विजय भांडारे (कबनूर) सुरेश गवळी (रुई) संदीप म्हाकावे (पट्टणकोडोली) चंद्रकांत बामणे (रांगोळी) विजय तारळेकर, (खोतवाडी) विजय घोलप (भादोले), सुरेश पाटील (पाडळी) दादासो वाघमोडे (अंबाप) शिवाजी वरुटे (कासारवाडी) राम सुतार, मेघा शिंदे, शारदा आंबले, निताताई भिसे, अमीर मुजावर, मुझफ्फर नदाफ, सुनील शिंदे, भाऊ भिसे (सर्व इचलकरंजी) दत्ता लाळगे पाटील (शिरढोण शिरोळ) यांचा समावेश करण्यात आला.
मार्गदर्शन करताना कॉ वसंत तांबे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







