ICHMH51NEWS.IN
9921600800

आर्य चाणक्य पतसंस्थेच्या ९ व्या शाखेचे पेठ वडगांव येथे उत्साहात उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आर्य चाणक्य पतसंस्थेच्या ९ व्या शाखेचे पेठ वडगांव येथे उत्साहात उद्घाटन

इचलकरंजी:
येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या पेठ वडगांव येथील नवव्या शाखेचे उद्घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते, तर माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
   याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात, डॉ. अशोक चौगुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक वसंतराव कमलाकर गुरूजी, उत्तर कोल्हापूर जिल्हा सहकार्यवाह मुकुंद पारीषवाड, पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशिनकर, उपाध्यक्ष पंकज मेहता, संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
   समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार, संचालक शांतिनाथ शिरगावे, अरविंद कुलकर्णी, नरोत्तम लाटा, सुदर्शन कदम, नंदकिशोर गोधडे, रामकिशोर भुतडा, कृष्णात सातपुते, मिरा हणमसागर, स्वाती कुलकर्णी, पंडीत ढवळे, नरेंद्रकुमार पुरोहित यांच्यासह संचालक मंडळ व सल्लागार मंडळातील मान्यवर सहभागी झाले. तसेच निसर्गप्रेमी ग्रुपचे डॉ. अमोल पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, व्यापारी असोसिएशनचे महादेव हावळ, डॉ. अभय यादव, चंद्रकांत नेर्लेकर, संतोष सणगर, विवेक दिंडे, सचिन पाटील, पद्मप्रभ पतसंस्थेचे बाबासो पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार गणपते आदींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
Advt
  यादव कॉलनी, पिसे कॉर्नर, पेठ वडगांव येथे झालेल्या या सोहळ्यात पतसंस्थेतर्फे नवीन “मंगलबंधन” कर्ज योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून महिलांना मंगळसूत्र खरेदीसाठी सोयीस्कर कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र राशिनकर यांनी सांगितले.
   शाखेच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी पतसंस्थेच्या विकासकार्याचा गौरव करत, ग्रामीण व शहरी भागातील बचत-निधी संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा शाखा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी, ग्राहकांचा विश्वास आणि नाविन्यपूर्ण योजना यांच्या जोरावर पतसंस्था अधिक प्रगती करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
वडगाव शाखा उद्घाटन प्रसंगीं आ.अशोकराव माने,माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ,राजेंद्र राशीनकर,जवाहर छाबडा, पंकज मेहता
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा