ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिका वर्धापन दिनानिमित्त ‘कामगार कायदे आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी’ विषयावरील व्याख्यान संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिका वर्धापन दिनानिमित्त ‘कामगार कायदे आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी’ विषयावरील व्याख्यान संपन्न

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यांचे ज्ञान तसेच त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी ज्येष्ठ कामगार कायदेतज्ज्ञ ॲड. आर. एल. चव्हाण यांचे ‘कामगार कायदे आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त राहुल मर्ढेकर, अशोक कुंभार, मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत व सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे उपस्थित होते.
व्याख्यानात ॲड. चव्हाण यांनी कामगार कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदी, कर्मचारी हक्क, सेवा नियम, शिस्त, कार्यक्षमता आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शासकीय सेवेत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आवाहन केले.

मार्गदर्शन करताना कायदेतज्ञ आर एल चव्हाण

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा