ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गोसावी गल्लीमध्ये दोन गटात मारहाण,परस्परविरोधी गुन्हे दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गोसावी गल्लीमध्ये दोन गटात मारहाण,परस्परविरोधी गुन्हे दाखल

इचलकरंजी:
शहरातील गोसावी गल्ली परिसरात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना घडल्या असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरातील नातेवाईक असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

याबाबत फिर्यादी सौ. प्रेरणा महादेव पडीयार (वय २५, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी विकी युवराज पडीयार, अक्षय भिमराव पडीयार, सोनाली भिमराव पडीयार यांच्यासह एकूण ८ जणांनी दुपारी दोनच्या सुमारास बेकायदेशीर जमाव केला. यावेळी ‘तु आमच्या जावई राहुल माळी यास फोन का केला’ या कारणावरून फिर्यादीसह तिच्या आई व भावाला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोहेकॉ घाटगे करीत आहेत.

तर फिर्यादी सौ. सोनाली सुनिल गोसावी (वय २५, रा. पिराई मळा, पट्टणकोडोली, मुळ रा. गोसावी गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी साडेएकच्या सुमारास आरोपी रोहीत महादेव पडीयार, अजित भिवा पडीयार, कविता महादेव पडीयार, प्रेरणा कुमार गोसावी व राजू जुवे यांनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्यांनी व लाकडी फळी, पट्टीने मारहाण केली. यात फिर्यादीसह अक्षय भिमराव पडीयार जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास पोहेकॉ भांगरे करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा