झेंडा चौकात शांतता भंग प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी (प्रतिनिधी) :
शहरातील झेंडा चौकात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी आठ जणांनी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करून परस्परांना मारहाण केली.
या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये अजित अजय साळुंखे, वैभव आनंदा साळुंखे, राजु दत्ता साळुंखे, तुषार राजु साळुंखे, उदय निकम, सुशांत घोरपडे, प्रसाद जाधव व ओंकार लाटवडे यांचा समावेश आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







