कन्या महाविद्यालयात सुगंधी उटणे तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी:
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या गृह विज्ञान विभागातर्फे दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे तयार करण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाराम कॉलेजच्या प्रा. हेमलता देसाई उपस्थित होत्या. त्यांनी उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण, मापे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तयार झालेले उटणे विक्रीस कसे आणावे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणते उपाय करता येतात आणि दर्जेदार उत्पादनाची ग्राहकांना पटवणी कशी करावी, याबाबतही त्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
Advt
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक करत, छोट्या-मोठ्या वस्तू तयार करून त्यांची विक्री केल्यास उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होतात, याकडे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गृह विज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगिता पाटील यांनी केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. सुधाकर इंडी विशेष उपस्थित होते. प्रा. स्वाती हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. मेघा देसाई यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह शिक्षक,कार्यकर्ते, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उटणे तयार करण्याच्या प्रशिक्षणावेळी उपस्थित विद्यार्थीनी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







