रोशनी ब्युटी सलून अँड अकॅडमी तर्फे इचलकरंजीत मेकअप सेमिनार आणि स्नेह मेळावा
इचलकरंजी : येथील रोशनी ब्युटी सलून अँड अकॅडमीच्या वतीने श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मेकअप सेमिनार तसेच प्रशिक्षित मुली व महिलांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून मराठी चित्रपट “झिंग” मधील अभिनेता सौरभ कुंभार आणि चित्रपटातील इतर कलाकार देखील सहभागी होणार आहेत.
अकॅडमीच्या प्रमुख रोशनी नागदेव, हेअर स्टायलिस्ट साक्षी गायकवाड व रियाना सलामुद्दीन प्रभुलकर यांनी ही माहिती दिली.
रोशनी नागदेव म्हणाल्या की, “मुंबई येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी इचलकरंजी येथे ही अकॅडमी सुरू केली असून आजपर्यंत ५०० हून अधिक मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर महिलांना व मुलींना घरी किंवा अन्य ठिकाणी व्यवसाय सुरू करता येतो. प्रशिक्षणादरम्यान सराव करून घेतला जातो. चार ते पाच महिन्यांचा कोर्स पूर्ण झाल्यावर संस्थे तर्फे प्रमाणपत्र दिले जाते, ज्यावरून वित्तीय संस्थांकडून कर्जही मिळते.”
Advt
अकॅडमीत चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे करणारी मशिनरी, तसेच टॅटू रिमूव्हलसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना सुरक्षित व आधुनिक सुविधा मिळतात. स्थानिकांसह परगावातील मुलीही प्रवेश घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारच्या सेमिनारमध्ये फॅशन शो, कोरियन ग्लास ट्रीटमेंट, ब्रायडल हेअर स्टाईल अशा आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर ऋषिकेश कोटला असून प्रवेश फी फक्त ९९ रुपये इतकी असल्याचे अकॅडमीच्या प्रमुखांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत संबोधित करताना रोशनी नागदेव व सहकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








