इचलकरंजी महानगरपालिका माझी वसुंधरा अभियान ६.० व प्रज्ञाशोध परीक्षेत राजवीर म्हेतर यांचे यश
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा 6.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2025 -26 अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये राजवीर रणजीत म्हेतर याने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच कै. प्रकाश शंकर मगदूम यांच्या स्मरणात व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरंजी संजय तेलनाडे स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिका प्रज्ञाशोध खाजगी आयटीएस 2024 25 परीक्षेमध्ये राज्यात विसावा जिल्ह्यात सतरावा तालुक्यात १४ वा नंबर पटकावला आहे.
Advt
यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी या शाळेचा मुख्याध्यापक सौ निशा सूर्यवंशी,मार्गदर्शक शिक्षक सौ देशमुख व कांबळे मॅडम सर्व स्टाफ यांचेकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच या यशामध्ये त्यांच्या आईचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व सरांतून त्याचे कौतुक होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







