ICHMH51NEWS.IN
9921600800

बिबट्याच्या नखांची तस्करी करणारा आरोपी इचलकरंजी पोलिसांच्या जाळ्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बिबट्याच्या नखांची तस्करी करणारा आरोपी इचलकरंजी पोलिसांच्या जाळ्यात

इचलकरंजी:

इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई करत वन्यप्राणी बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची बिबट्यासदृष्य ४ नखे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी विजय पांडुरंग माळवदे यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी पंचगंगा नदी रोड – पंचगंगा स्मशानघाट परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. संशयित इसम संदिप सुनिल हंचनाळे (वय २७, मुळ रा. निप्पाणी, सध्या मत्तीवडे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) हा संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बिबट्यासदृष्य पांढऱ्या रंगाची अर्धवर्तुळाकार ४ नखे सापडली. त्यांची एकूण किंमत १,६०,००० रुपये इतकी आहे.

ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, पोहेकॉ. उदय करडे, अनिल पाटील, पो.ना. फिरोज बेग, पोकों. अमर शिरढोणे, पो.कॉ. विजय माळवदे, चा.पो.शि. निलेश चव्हाण यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. अनिल पाटील करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा