डी के ए एस सी महाविद्यालयाच्या फेन्सिंग खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित शासकीय फेन्सिंग खेळाच्या स्पर्धा शिवाजी विद्यापीठ स्पोर्ट्स विभाग हॉल या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.
या झालेल्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या फेन्सिंग खेळाडूंनी आपल्याजवळील कौशल्यांचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त केले. यामध्ये सिया पवार (फॉलिन) प्रथम क्रमांक जावेद शेख ( फॉलिन) तृतीय क्रमांक,आराधना शर्मा ( सेबर ) तृतीय क्रमांक मिळवला. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
Advt
खेळाडूंनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रबंधक श्री आर बी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य एस के खाडे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







