ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.    

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.    

 इचलकरंजी
 येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिर मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आपटे वाचन मंदिर चे माजी अध्यक्ष श्री. रमेश मर्दा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्या आपटे वाचन मंदिराचे कामकाज अत्यंत उत्तम प्रकारे चालू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि संचालक मंडळाचे कौतुक केले.
Advt
  ग्रंथालयाच्या सभासदांना नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांची माहिती व्हावी या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनामध्ये कथा, कविता,  कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ललित, प्रवास वर्णन, व्यक्तिमत्व विकास, बाल अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे. सदरचे प्रदर्शन शनिवार दि. १८ऑक्टोबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते  ८  या वेळेत चालू राहणार आहे.
  ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला. सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी आभार मानले.            याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक श्री. संजय सातपुते, सौ. मीनाक्षी तंगडी, कु. माया कुलकर्णी तसेच श्री. सुरेश कोळी, श्री. बाळकृष्ण म्हेत्रे  व वाचक उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनावेळी अध्यक्ष सुषमा दातार व पदाधिकारी,वाचक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा