शालेय शासकीय स्पर्धेमध्ये
हिरा-राम हायस्कूलचे घवघवीत यश
इचलकरंजी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका शालेय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत इचलकरंजी येथील हिरा-राम हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले.
त्यामध्ये 14 वर्षाखालील मुली गटात कु. प्रतीक्षा संदीप बोराडे सहाशे मीटर धावणे प्रथम क्रमांक, कु. राजनंदिनी प्रकाश टाकळे 400 मीटर धावणे प्रथम तर कु. आर्या दगडू लवटे तृतीय क्रमांक. 17 वर्षाखालील मुली गटात कु. कल्याणी रामचंद्र खरात गोळा फेक द्वितीय क्रमांक, कु. फैरुनिसा खाजेसाब मकानदार 3000 मीटर धावणे द्वितीय क्रमांक व 1500 मीटर धावणे तृतीय क्रमांक, कु. स्नेहल सुभाष बोराडे 800 मीटर धावणे तृतीय व 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक यांचा समावेश आहे.
Advt
यामधील प्रतीक्षा बोराडे, राजनंदिनी टाकळे, फैरुनिसा मकानदार व कल्याणी खरात या चार मुलींची डेरवण रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री बर्गे व श्री. पटेल तसेच मुख्याध्यापक श्री. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जांभळे, सचिव सुहास जांभळे व संचालक सचिन जांभळे यांचे प्रोत्साहन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







