ICHMH51NEWS.IN
9921600800

मुख्य मार्गावर पुन्हा बाजार भरला; महापालिकेचे प्रयत्न अपुरे, उच्च न्यायालयाच्या आदेशाला कोलदांडा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्य मार्गावर पुन्हा बाजार भरला; महापालिकेचे प्रयत्न अपुरे, उच्च न्यायालयाच्या आदेशाला कोलदांडा

इचलकरंजी –
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुख्य रस्त्यावर रविवारी पुन्हा बाजार भरल्याने प्रशासनाची अंमलबजावणी कोलमडल्याचे चित्र दिसले. शनिवारी पोलिसांनी रस्ता मोकळा केला होता. अतिक्रमण निर्मूलन पथक अग्निशमन गाडी मार्गावरून फिरवत होते; पण गाडी पुढे गेल्यानंतर व्यापारी पुन्हा बसत होते. असा लपंडाव तब्बल ५ ते ६ वेळा झाला. रविवारी सकाळी व्यापाऱ्यांनी मलाबादे चौकात ठिय्या मारत प्रशासनाविरोधात भूमिका घेतली आणि तणाव निर्माण झाला. शेवटी मुख्य रस्त्यावर बाजार भरलाच.

महापालिकेची अंमलबजावणी कागदोपत्रीच राहिली. अतिक्रमण निर्मूलन पथकास सक्षम अधिकारी न देता स्थानिक लिपिकावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच पुरेसे मनुष्यबळ न मिळाल्याने कारवाई प्रभावी ठरली नाही. आयुक्त व आमदार यांनी अलिप्त भूमिका घेतल्याची चर्चा असून न्यायालयात अडचण येऊ नये यासाठी फक्त सोपस्कार पार पाडल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

 

मुख्य रस्त्यावर पुन्हा बाजार भरल्याने स्थानिक व्यापाऱ्यांत नाराजी व्यक्त होत असून जबाबदारी कोण घेणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे. नागरिक प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा