भोनेमाळात दोन गटांत हाणामारी — परस्परविरोधी तक्रारी दाखल
इचलकरंजी (प्रतिनिधी):
भोनेमाळ परिसरात झालेल्या किरकोळ वादातून दोन गटांत मारहाण, शिवीगाळ व दहशत निर्माण केल्याची घटना घडली असून, या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ही घटना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली.
पहिल्या तक्रारीत बानुबी नजीर पठाण (वय ५०) यांनी फिर्याद दिली असून, आरोपी दत्ता बाळकृष्ण मांडव, प्रेम दत्ता मांडव, स्वप्नील प्रकाश ढेरे, अक्षय भोंगे, करण कोरवी, रणजीत खरवार व इतर यांचा समावेश आहे. फिर्यादींच्या तक्रारीनुसार अर्वाच्य शब्दात बोलण्याच्या वादातून एकत्र येऊन हातात लोखंडी कोयता, दगड, फरशी व लाकडी काठ्या घेऊन हल्ला केला. या घटनेत अमीर पठाण व त्यांची पत्नी सुमैय्या पठाण जखमी झाले.
या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास पो.हे.कॉ. रोटीवाले करीत आहेत.
दरम्यान, याच घटनेवर दुसऱ्या गटातील अशा गजानन भोंगे (वय ४९) यांनीही फिर्याद देत अमीर पठाण, सुमैय्या पठाण, बानुबी पठाण, जास्मीन गरगरे, लैला शेख, समीर पठाण, रमजानबी पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, पठाण कुटुंबीयांनी घरात घुसून शिवीगाळ, धमक्या व मारहाण केली. तसेच आरोपी अमीर पठाण याने दगड फेकून दत्ता मांडव व प्रेम मांडव यांना जखमी केले.
या संदर्भात गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक फौजदार अबिटकर करीत आहेत.
दोन्ही बाजूंकडील तक्रारी परस्परविरोधी असल्याने शिवाजीनगर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







