ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रबोधिनीत रविवारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे व्याख्यान 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रबोधिनीत रविवारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे व्याख्यान 

इचलकरंजी ता. ,२४ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी ” जागतिक घडामोडी आणि आपण ” या विषयावर माजी परराष्ट्रसचिव, राष्ट्रीय मानव आयोगाचे सदस्य व जेष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. समाजवादी प्रबोधिनी आणि डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात रविवार ता. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५  वाजता हे व्याख्यान होणार असून या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात चर्चाही होणार आहे. तरी या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन दोन्हीही संयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा