इचलकरंजीतील माजी नगरसेवक पुत्राच्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई माजी नगरसेवकासह ११ जणांवर गुन्हा, ५.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी, दि. २७ :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या पथकाने इचलकरंजी शहरातील सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात मध्यरात्री मोठी कारवाई करत सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास माजी नगरसेवक पुत्र आरोपी इजाज इक्बाल कलावंत (वय ३९, रा. पाटील मळा, सांगली रोड, इचलकरंजी) याने स्वतःच्या घरात अवैध जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करून प्रत्येक डावावर ३ टक्के कमिशन घेत आरोपी क्रमांक २ ते ११ यांना एकत्र करून “तीन पत्ती” या पत्त्यांचा जुगार खेळ सुरू होता.
Advt
या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपींकडून रोख रक्कम १ लाख १ हजार ६०० रुपये, ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे १० मोबाईल हॅण्डसेट तसेच पत्त्यांची पाने व जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी इजाज इक्बाल कलावंत (३९), माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे (४३), इम्तियाज इक्बाल खतीब (३९), कौस्तुभ किरण हजारे (३३), गणेश संजय झुंजकर (३८), संजय अंतू सावंत (४५), लियाकत इब्राहिम शेख (३४), चाँद मेहबूब जमादार (४८), चेतन विजय कोईक (४६), संजय परशुराम कांबळे (३९) आणि गणेश लक्ष्मण पसारे (२६) या अकरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईसंबंधी फिर्याद विशाल अंगद चौगले ( स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून तपास पोहेकॉ पाथरवट हे करीत आहेत.
इचलकरंजी पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष
इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकल्याने स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







