प्रबोधन वाचनालयात दिवाळी अंक योजना सुरू
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ” दिवाळी अंक योजना ” सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये साहित्यरसिक वाचकांना अनेक उत्तमोत्तम अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेचा प्रारंभ स्वाती दातार, अन्वर पटेल ,अर्चना दातार, विजय पाटील ,अजितमामा जाधव, अल्लाबक्ष मुजावर, रेवती रुकडे, रेखा सौंदत्तीकर, महंमद शेडबाळे, सुषमा कोळेकर, उमेश शिंदे, अजिज शेडबाळे, अभिषेक भगत ,प्रमोद घालवाडकर इत्यादी अनेकांनी सभासदत्व स्वीकारून केला आहे. इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिकांनी या योजनेचे सभासद स्वीकारून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच योजनेच्या माहितीसाठी व सभासद होण्यासाठी प्रबोधन वाचनालय, द्वारा समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रीयल इस्टेट, राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







