इचलकरंजी महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार; पहिला महापौर काँग्रेसचाच – अॅड. रामहरी रुपणवार
इचलकरंजी:
आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित होणार असून पहिला महापौर हा काँग्रेस पक्षाचाच असेल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रभारी व माजी आमदार अॅड. रामहरी रुपणवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार सर्व जिल्ह्यांसाठी प्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी अॅड. रुपणवार यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
Advt
या वेळी रुपणवार म्हणाले, “देशातील भयावह राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आगामी काळात काँग्रेसची सत्ता पुन्हा सर्वत्र येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार अधिक मजबूत करून निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागावे.”
Advt
बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद खुडे यांनी तर आभार सचिन साठे यांनी मानले. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती.
मार्गदर्शन करताना अँड रामहरी रुपणावर व्यासपीठावर शशांक बावचकर,प्रमोद खुडे,शेखर पाटील,राजन मुठाणे,बिस्मिल्ला गैबान
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








