इचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – १.७१ लाखांचा अवैध गुटखा जप्त.
व्हिडीओ- https://youtu.be/WPoZx9fIi3o?si=eAYeVcudy5GgDrkS
इचलकरंजी :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी शहरात छापा टाकून १,७१,७१० रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी वसीम यूनुस तांबोळी (वय २९, रा. इंदिरानगर गल्ली नं. ३, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
Advt
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही आरोपी आपल्या राहत्या घरात पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी व जर्दा यांचा साठा करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेल्या वस्तूंची किंमत १,७१,७१०/- इतकी असून, पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त माल इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पो. उप.नि. संतोष गळवे, पो. अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगले, संतोष बरगे, राजू कोरे आणि सागर चौगले यांनी संयुक्तपणे केली.
गुटख्यासह आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







