बिहार निवडणुकीमध्ये घवघवीत यशाचा भारतीय जनता पार्टी वतीने विजयोस्तव साजरा.
इचलकरंजी:
भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले त्याचा आनंदत्सोव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालय येथून शिवतीर्थ मार्गे गांधी पुतळा येथे रॅलीने विजयाच्या जयघोष करून फटकेबाजी करत जल्लोष साजरा केला.
यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी बोलताना सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय या निवडणुकीमध्ये लागलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्र पक्षाने २०० पेक्षा जास्त जागा निवडून येऊन विक्रमी विजय संपादन केला. या विजयाच श्रेय तेथील असणाऱ्या सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि तमाम जनतेला जाते. एनडीए सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीए सरकारला सत्तेमध्ये बसवून विकासाभिमुख कामाला पसंती दिलेली आहे. विरोधकांची वोट चोरी ही दिशाभूल करणारी ठरली असून बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे आमदार निवडून देऊन घवघवीत यश संपादन केले.
यावेळी बिहारच्या जनतेने भल्याभल्यांचा बाजार उठवला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांचाही जनता बाजार उठल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
यावेळी पुर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पूर्व मंडल महिला अध्यक्षा सौ. सीमा कमते, पश्चिम मंडल महिला अध्यक्षा सौ. सपना भिसे, जिल्हा चिटणीस सौ. पूनम जाधव, माजी अध्यक्ष सौ. अश्विनी कुबडगे, सौ.नीता भोसले, सौ.रंजना डावरे, नागुबाई लोंढे, सौ.ज्योती लाटणे, सौ.योगिता दाभोळे, शबाना शाहा, मंगल सुर्वे, मनोज साळुंखे, पूर्व मंडल युवा मोर्चा अध्यक्ष सचिन पवार, पश्चिम मंडल युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बचाटे, सरचिटणीस शिवानंद रावळ, महेश पाटील, रवींद्र जावळे, अनिकेत पाटील, राजू पुजारी, उत्तम विभूते, नागेश पाटील, बाळकृष्ण तोतला, शांतिनाथ कामत, तानाजी भोसले, उमाकांत दाभोळे, आप्पा काजवे, सचिन माळी, संजय गेजगे, रवींद्र घोरपडे, दत्तात्रय मांजरे, सुशांत बेडक्याळे, कोंडीबा दवडते, शेखर शहा, राहुल पवार, दीपक पाटील, प्रमोद पाटील, हेमंत वरुटे, शुभम बरगे, केशव सणगर, राजकुमार भाकरे, श्रीनिवास फुलपाटी, सतीश भस्मे, चंद्रकांत इंगवले, सौ.दिपाली लोटे, सौ.सुप्रिया शिंदे, सौ.संध्या लायकर, अमिता बिरंजे, सौ.विद्या लवटे, सौ.जयश्री शेलार, सौ.सारिका सोनाळे, सौ.पुष्पा काकडे, सौ.पूजा भिलुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिहार विजयाचा आनंद साजरा करताना आ. राहुल आवाडे व भाजप पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







