अखेर इचलकरंजीला प्रभारी पुरवठा अधिकारी, विठ्ठल चोपडेच्या प्रयत्नास यश
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री डोंगरे यांच्या बदलीनंतर तब्बल १६ महिन्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून श्रीमती सूर्यवंशी यांनी आज पदभार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता.
इचलकरंजी शहरात असणाऱ्या पुरवठा कार्यालयात अंत्योदय,प्राधान्यक्रम यासह सुमारे ९० हजार रेशन कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना शासनाच्या योजनेअंतर्गत अन्य धान्य तसेच वेगवेगळ्या सुविधा या कार्यालयामधून पुरवल्या जातात. मार्च २०२३ मध्ये या ठिकाणी असणारे पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री डोंगरे यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी नवीन पुरवठा निरीक्षण अधिकारी उपलब्ध नसल्याने अन्नधान्य सोबतच इतरही विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना अडचणींना समोर जावे लागत होते.
२०२२ मध्ये नवीन आकृतीबंध तयार होताना येथील कार्यालयाची सर्व पदे रद्द झाल्याने या कार्यालयाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत पालकमंत्री नामदार यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री ना.
अजितदादा पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांचे कडे श्री चोपडे यांचा पाठपुरावा चालू असून लवकरच खास बाब म्हणून या कार्यालयाला सुद्धा मान्यता मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्पुरता पदभार जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात यावे अशी सूचना पालकमंत्री नामदार मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली होती. त्यानुसार श्रीमती सूर्यवंशी यांच्याकडे पदभार देण्याचा आदेश करण्यात आला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800