सुवीर २.० स्पर्धेत इचलकरंजीची निधी रुपेश चोपडा तृतीय.
इचलकरंजी
नगर ज्ञान, आत्मविकास आणि धर्मसंस्कार यांचा सुंदर संगम घडवणारी सुवीर २.० पुच्छिसुणं ही भव्य स्पर्धा पुणे येथील श्री संघ सांस्कृतिक भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. टीम उडानतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील तसेच परदेशातीलही स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. एकूण १५०० हून अधिक बाल-तरुण स्पर्धकांमध्ये दोन गटांत परीक्षा घेण्यात आली.
भगवान महावीरांच्या उपदेशातून साकारलेल्या २९ गाथांचे कंठस्थ वाचन, धर्मज्ञान व अध्यात्माचे संवर्धन हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असून प्रविणऋषिजी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात कार्यक्रम पार पडला.
या प्रतिष्ठित स्पर्धेत इचलकरंजी शहरातील निधी रुपेश चोपडा हिने तृतीय क्रमांक पटकावत शहराचे नाव उज्ज्वल केले. तिच्या यशाचे शहरभर कौतुक होत असून परिश्रम,धर्मज्ञानाची ओढ आणि नियमित अभ्यासाची शिस्त हा तिच्या यशाचा पाया असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात विजेत्यांना विविध आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व २९ गाथा कंठस्थ करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सन्मानचिन्ह देण्यात आले. विविध धार्मिक सादरीकरणे, नाटके व वाद्य प्रस्तुतींनी कार्यक्रमाला आणखी उजाळा दिला.
निधीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.निधीला यासाठी श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ व
आनंद जैन पाठशाळा इचलकरंजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







