इचलकरंजी महानगरपालिकेत स्व. इंदिराजी गांधी जयंती व स्व. दत्ताजीराव कदम पुण्यतिथी निमित्त अभिवादन
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी खासदार स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका सभागृहात आयोजित या कार्यक्रमात उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य लेखा परीक्षक आरती खोत आणि सहायक आयुक्त रोशनी गोडे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, स्व. इंदिरा गांधी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरा केला जात असल्याने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला सहायक आयुक्त धनंजय पळसुले, नितीन बनगे, रामचंद्र कांबळे, सहायक करसंकलन अधिकारी दीपक खोत, सदाशिव जाधव, संदीप जोशी, प्रदीप झंबरी, अशोक कमते यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.इंदिरा गांधी व स्व.दत्ताजीराव कदम यांना अभिवादन करताना महापालिका प्रशासन
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







