ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये स्व. इंदिराजी गांधी जयंती व स्व. दत्ताजीराव कदम पुण्यतिथी स्मरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये स्व. इंदिराजी गांधी जयंती व स्व. दत्ताजीराव कदम पुण्यतिथी स्मरण

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती तसेच इचलकरंजीचे भाग्यविधाते स्वर्गीय दत्ताजीराव कदम (अण्णा) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी इंदिराजी गांधी यांच्या बलिदानाची आणि दत्ताजीराव कदम यांच्या विकासदृष्टीची आठवण ठेवत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रहित, समाजहित आणि लोककल्याणासाठी कटिबद्ध राहण्याच्या निर्धाराने झाली.

स्व.इंदिरा गांधी व स्व.दत्ताजीराव कदम यांना अभिवादन करताना कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा