विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी :
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत डेरवण येथे झालेल्या शासकीय खो-खो स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सतरा वर्षाखालील तसेच एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करून द्वितीय क्रमांक मिळवला. दरम्यान, मिरज येथे पार पडलेल्या विभागीय खो-खो स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या तिहेरी यशाबद्दल श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारोतराव निमनकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांनी समाधान व्यक्त करत विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे आणि ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक केले.
या विजयी संघांना जिमखाना प्रमुख बी. एस. माने, क्रीडा शिक्षक के. ए. पाटील व व्ही. के. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
खो खो स्पर्धेतील यशस्वी खेळाडूसोबत कृष्णा बोहरा व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







