इचलकरंजी–कोल्हापूर रोडवर अपघात; वृद्धाचा मृत्यू
इचलकरंजी:
इचलकरंजी ते कोल्हापूर मार्गावर कबनूर हद्दीत हॉटेल वैशाली गार्डनजवळ सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुरली बडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील अशोक धोंडीबा बडवे हे त्यांच्या होंडा अॅक्टीव्हा (MH09EE6839) वरून जात असताना मागून येणाऱ्या स्प्लेंडर (MH09GL0492) मोटारसायकलने जोरदार धडक दिली. आरोपी तौफीर अखानी यांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप आहे. धडकेत अशोक बडवे गंभीर जखमी झाले असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात आरोपी देखील जखमी झाला असून या प्रकरणी वाहनधारकावर गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास सपोनि वायदंडे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







