इचलकरंजीत बेकायदेशीर गॅस भरणाऱ्याविरोधात कारवाई २१ भरलेल्या टाक्यांसह मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
शहरातील राधाकन्हैय्या वे- ब्रिजजवळील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रीफिलिंग करणारी कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी आज दुपारी केली. या कारवाईत एकूण २१ भरलेल्या आणि ९ रिकाम्या गॅस टाक्या तसेच रीफिलिंग यंत्रणा जप्त करण्यात आली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ७३,५०० रुपये किमतीच्या १८ एचपी, २ भारत गॅस आणि १ इंडेन कंपनीच्या भरलेल्या टाक्या ताब्यात घेतल्या. तसेच २५,००० रुपये किमतीच्या ९ रिकाम्या टाक्या, दोन वजनकाटे, मोटर संच आणि रेग्युलेटरसह एकूण १,१६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी श्रीकांत बाबासाहेब पांडव (वय ५१, रा. स्टेशन रोड, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद असून तपास उर्मिला खोत करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







