इचलकरंजीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
इचलकरंजी –
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘स्व. दगडूलाल मर्दा स्मृति राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सतरावे वर्ष असून सदरची स्पर्धा येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येथे शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
सदरच्या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी… त्रिभाषा सूत्र- गरज की हानी, ज्ञानदेवे रचिला पाया, टॅरीफ- आव्हान की संधी, डिजीटल व्यसनाधीनता, निसर्गचक्र बदलाची आव्हाने, आरक्षण…? आणि जेन झी- युवा पिढीच्या नजरेतून आजचे राजकारण यापैकी एका विषयावर बोलायचे आहे. सदरची स्पर्धा ज्युनिअर व सीनियर कॉलेज विद्यार्थ्यांपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. प्रत्येक स्पर्धकास जास्तीत जास्त दहा मिनिटे वेळ असून भाषा मराठी राहील.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. स्पर्धकाचे वय २५ वर्षाच्या आत असावे. स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक ७००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ५००० रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक ३००० रुपये व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ २००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रे आणि सर्वांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी दिनांक १८ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख असून स्पर्धेसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी राहील. परगावाहून येणाऱ्या स्पर्धकांना दोन्ही वेळचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे तसेच सर्व स्पर्धकांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा सुंदर बागेजवळ, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर (दूरध्वनी ९९६०००१२०७ अथवा ८२३७५२२५२२) येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







