डीकेटीईचे प्रा. वाय.एम. कांबळे यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:
येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. वाय.एम.कांबळे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. कांबळे हे गेली १८ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘ पॅरालल ऑप्टिमायजेशन फॉर इमेज ऑटोरेग्रेसिव इंटरपोलेशन मॉडेंल युजिंग जीपीयुज’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी गर्व्हमेंट कॉलेज कराड, आय.टी. विभागप्रमुख डॉ आर.बी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. योगेश कांबळे यांच्या संशोधनातून आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ३ शोधनिबंध प्रकाशित झाले असून, २ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील विभागप्रमुख प्रा.डॉ. डी.व्ही. कोदवडे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800