ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात दोन दिवसीय दंतचिकित्सा शिबिराचे उत्साहात उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात दोन दिवसीय दंतचिकित्सा शिबिराचे उत्साहात उद्घाटन

इचलकरंजी :

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि महिला सबलीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मुख्य पाहुणे म्हणून डॉ. कौस्तुभ चांडवले आणि डॉ. सलोनी मर्दा उपस्थित होते.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसोबत त्यांच्या शारीरिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याने महाविद्यालयात अशा उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या शुभेच्छा संदेशाने झाले. त्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन कु. सलोनी माडिवाळ हिने तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी केले.

महाविद्यालयातील ज्युनियर व सिनियर विभागातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दंत तपासणीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटन करताना प्रा.त्रिशला कदम व डॉ चांडवले व  डॉ.मर्दा

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा